बाबासाहेबांना जात आणि धर्म चौकटीच्या बाहेर काढा : अनुप कोहळे

87

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांनी नेहमी मानव जातीच्या कल्याणाकरिता व राष्ट्राच्या उभारणी करिता कार्य केले. बाबासाहेबांचे व इतर महापुरुषांचे विचार घरा घरात पोहचवायचे असतील तर या महामानवांना जात आणि धर्म चौकटीच्या बाहेर काढावे लागेल व सर्व समाज बांधवांना जातीभेद विसरून एकत्रित यावे लागेल, असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त, युवा सामाजिक कार्यकर्ते अनुप कोहळे यांनी केले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती तथा रमाई महिला मंडळ गडचिरोलीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव निमित्त आयोजित प्रबोधनपर कार्यक्रमात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. अनिल चहांदे, मुख्य अतिथी म्हणून माजी न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नीता सहारे, प्रा. सुखदेवे, मार्गदर्शक म्हणून युवा व्याख्याती संतोषी सुत्रपवार आदी मान्यवर, रमाई महिला मंडळाचे सर्व सदस्य व मोठ्या संख्येने बाबासाहेबांच्या विचारांचे वारसदार यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यभान घुटके यांनी केेेले तर आभार प्रा. पाटील यांनी मानले.