राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इंदिरा गांधी चौकात महाप्रसाद वितरण

117

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त इंदिरा गांधी चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा गडचिरोलीकडून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसनअली गिलानी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश ताकसांडे, शहर अध्यक्ष विजय गोरडवार, युवक जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, तालुकाध्यक्ष विवेक बाबनवाडे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, जिल्हा सचिव संजय कोचे, जिल्हा संघटन सचिव संजय शिंगाडे, गडचिरोली शहर युवक कार्याध्यक्ष कपिल बागडे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष इंद्रपाल गेडाम, सामाजिक न्याय विभागाच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रमिलाताई रामटेके, माजी नगरसेविका मिनलताई चिमुरकर, माजी नगरसेविका कुमरे, शहर सचिव अमोल कुळमेथे, ज्येष्ट नेते कालवाजी, युवा नेते हर्षल वासेकर तथा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.