Home गडचिरोली महायुतीकडून आमदार डॉ. देवराव होळी यांनाच उमेदवारी द्यावी

महायुतीकडून आमदार डॉ. देवराव होळी यांनाच उमेदवारी द्यावी

85

– शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेतून मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून २०१४ व २०१९ ला झालेल्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले भाजपाचे विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांनाच २०२४ ला होऊ घातलेल्या विधानसभेत गडचिरोलीमधून महायुतीने उमेदवारी द्यावी, अशी मागणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार होळी मित्रपरिवारातील नेत्यांनी येथील वैभव हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेतून केली आहे.

येत्या, २५ ऑक्टोबरला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार डॉ. देवराव होळी मित्रपरिवार व समर्थकांचा, कार्यकर्त्यांचा मेळावा अभिनव लॉन येथे आयोजित करण्यात आ ल्याची माहिती सुद्धा या पत्रकार परिषदेतून देण्यात आली.

आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्याप्रमाणेच कोटगल बॅरेज सिंचन योजना यासारखे अनेक विकास कामे केली. विकासदृष्टी असणाऱ्या आमदार डॉ. देवराव होळी यांनाच भाजपाने येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत गडचिरोली येथून उमेदवार म्हणून घोषणा करावी, अशी मागणी या पत्रकार परिषदेतून करण्यात आली.

या पत्रकार परिषदेला हेमंत जम्बेवार अध्यक्ष शिवसेना (शिंदे गट), राकेश बेलसरे, मुक्तेश्वर काटवे भाजपा शहराध्यक्ष, विलास दशमुखे माजी सभापती, विलास निखारे सरपंच, नीता वडेट्टीवार, माजी नगराध्यक्षा योगिता पिपरे, लौकिक भिवापुरे यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

error: Content is protected !!