अहेरी तालुक्यातील देचलीपेठा बिराड घाटवरून भोपाल – पठणम जाण्याकरिता ब्रिज मंजूर करा : समाजसेवक जावेद अली यांची मागणी

88

– 150 गावांचा विकास होण्यास व रोजगाराचा प्रश्न सुटण्यास होणार मदत

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील देचलीपेठा बिराड घाटवरून भोपाल – पठणम जाण्याकरिता शासनाने ब्रिज मंजूर करावा, अशी मागणी अहेरी येथील समाजसेवक जावेद अली व गाववासियांनी केली आहे.

 अहेरीवरून छत्तीसगडला जाण्याकरिता सिरोंचा – आसरअली – पातागुडमवरून म्हणजे आलापल्ली, सिरोंचा, पातागुडम म्हणजे 150 किमी अंतर पार करावे लागते. मात्र जर आलापल्ली, जिमलगट्टा, देचलीपेठा बिराड घाट या मार्गाने भोपाल पठणमला गेल्यास 80 किमीचा मार्ग आहे. छत्तीसगड राज्यात महाराष्ट्र राज्यातील लोकांचा रोटी बेटी चा चांगलाच संबंध आहे. या मार्गावर जर केंद्र सरकार व राज्य सरकारने या ब्रिजला मंजुरी दिली तर अहेरी तालुक्यातील 100 ते 150 गावांचा मोठ्या प्रमाणात विकास होऊ शकतो व रोजगार उपलब्ध होण्याचा मोठा प्रश्न मिटू शकतो व अहेरी, सिरोंचा, पातगुडम 150 किमीचा अंतर पार करण्याची आवश्यकता नाही, अशी मागणी जावेद अली यांच्यासह शेकडो गाववासीयांनी केली आहे.