हनुमान जयंतीनिमित्त आमदार डॉ. देवराव होळी यांची विविध ठिकाणच्या मंदिरात उपस्थिती

110

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी काल चामोर्शी नगरातील आष्टी – घोट रोड येथील हनुमान मंदिर, साधूबाबा कुटी हनुमान मंदिर, बाजार चौक येथील हनुमान मंदिर, पोलीस स्टेशन समोरील हनुमान मंदिर व आमगाव महाल येथील हनुमान मंदिरात दर्शन घेतले व दिला शब्द पूर्ण करीत स्थानिक आमदार विकास निधीतून दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करून भूमिपूजन सुद्धा केले.

तसेच आमदार डॉ. देवराव होळी यांनी चंद्रपूर जिल्ह्यतील कन्हाळगाव येथील हनुमान मंदिर येथे सदिच्छा भेट दिली व पूजन करून दर्शन घेतले. त्यानंंतर चंद्रपूर जिल्ह्यतील हरणघाट येथील कार्तिकस्वामी धाम येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी उपस्थिती दर्शविली. गडचिरोली जवळील सेमाना देवस्थान येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा उपस्थित होते. गडचिरोली जवळील बटेश्र्वर देवस्थान येथे उपस्थिती दर्शविली. हनुमान जयंती निमित्याने नवेगाव गडचिरोली येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी उपस्थित होते. यावेळी येथील साई मंदिर सभागृहाचे लोकार्पण आमदार डॉ. होळी यांच्या हस्ते करण्यात आले.

शिवाजी नगर नवेगाव गडचिरोली येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी उपस्थित राहून येथील भाविक भक्तांंसोबत आमदार डॉ. होळी यांनी संवाद साधला. चामोर्शी नगरीत येथील युवकांच्या पुढाकाराने भव्य हनुमान जयंती शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी या
शोभायात्रेत गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. देवराव होळी प्रामुख्याने उपस्थित होते.