राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्वरित मंजूर करा

76

– जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांंकडे मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : नायब तहसीलदार पदाचा राज्यस्तरीय संवर्ग रद्द करणे, महसूल सहाय्यकाची पदभरती करणे, पदोन्नती देणे या सारख्या अनेक मागण्यांचा पूर्ततेसाठी राज्य महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने दि.4 एप्रिल 2022 पासून बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनास जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी भेट दिली असून महसूल कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, शेती बाबतची प्रमाणपत्रे, यासारखी असंख्य प्रसासकीय कामे पूर्णपणे ठप्प झाली असून यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे जनतेच्या व महसूल कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याकरिता रास्त असणाऱ्या मागण्यांच्या पूर्ततेकरिता आपण माननीय मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांच्या कडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी यावेळी दिले व जिल्हाधिकाऱ्यांंमार्फत महसूल कर्मचाऱ्यांचे मागण्या मान्य करण्याकरिता मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांच्याकडे मागणी केली. यावेळी शिक्षक सेलचे अध्यक्ष देवाजी सोनटक्के, माजी जि. प. अध्यक्ष समय्या पसुला, ओबीसी सेल अध्यक्ष पांडूरंजी घोटेकर, भडके, गडसुलवार, जिल्हा सचिव सुनिल चडगुलवार, लतीफ पठाण, अध्यक्ष चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना, संजुभाऊ वडेट्टीवार, ज्येष्ठ कार्यकर्ते, काँग्रेस पक्ष व चंदुभाऊ प्रधान, अध्यक्ष, महसुल कर्मचारी संघटना, जिल्हा शाखा गडचिरोली, वनिश्यामजी येरमे, महसुल कर्मचारी संघटना, जिल्हा शाखा गडचिरोली, मयुर गावतुरे यांच्यासह अनेक मंडळी यावेळी उपस्थित होते.