गडचिरोली येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना केले अभिवादन

81

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, ११ एप्रिल २०२२ रोजी थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश उध्दवराव ताकसांडे जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा गडचिरोली, इंद्रपाल गेडाम जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा गडचिरोली, प्रमिलाताई रामटेके महिला जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष गडचिरोली, संजय कोचे सचिव राष्ट्रवा काँ. पा.जिल्हा गडचिरोली, जगन जांभुळकर सरचिटणीस रा. काँ. पार्टी. जि. गडचिरोली, विवेक बाबनवाडे तालुका अध्यक्ष गडचिरोली, सम्राट उंदिरवाडे सरचिटणीस, शैला कातकर महिला उपाध्यक्ष सा.न्या.वि. जिल्हा गडचिरोली, सविता चव्हाण सरचिटणीस महिला सा.न्या.विभाग जिल्हा गडचिरोली, भूमिका इंदुरकर, खुशाल इंदुरकर, जितेंद्र मुप्पीडवार, किशोर बावणे, संजय शिंगाडे, निखिल साखरे, प्रणश्री कोचे आदी उपस्थित होते.