भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानीताई दाणी यांच्या हस्ते भाजपाच्या युवा वाॅरिअर्स अभियानाचा शुभारंभ

148

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भाजपाच्या 1 प्रभाग 25 युवा वाॅरिअर्स या अभियानाचा शुभारंभ भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानीताई दाणी यांच्या हस्ते आज, 12 एप्रिल रोजी करण्यात आले. यावेळी युवा वाॅरिअर्स अभियान फलकाचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. अहेरी विधानसभा क्षेत्रात या अभियानाचा शुभारंभ करण्यात आल्यानंतर चामोर्शी येथे अभियान फलकाचे अनावरण शिवानीताई दाणी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, आमदार डॉ. देवराव होळी, भाजपा नेते गोविंद सारडा, भाजयुमो पूर्व समन्वयक वामन तुर्के, भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री तथा गडचिरोली विधानसभा अभियान प्रमुख मधुकर भांडेकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, भाजयुमो जिल्हा प्रभारी अनिल डोंगरे, सहप्रभारी अमित गुंडावार, प्रदेश सदस्य स्वप्निल वरघंटे, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, संजय बारापात्रे, तिडके, सागर कुमरे, हर्षल गेडाम, राजू शेरकी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.