अकोला जिल्हा पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते जिजामाता कृषिभूषण पुरस्कारप्राप्त प्रतिभाताई चौधरी यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

76

– डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे महिला मेळावा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या वतीने २९ मार्च रोजी अकोला येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील जिजामाता कृषीभूषण पुरस्कारप्राप्त, प्रगतशील शेतकरी प्रतिभाताई चौधरी यांना शेती क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू, अकोला जिल्हाधिकारी, अकोला जिल्हा मुख्य कार्यपालन अधिकारी तसेच ईतर मान्यवर उपस्थित होते.

डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथे प्रतिभाताई चौधरी यांना सन्मान प्राप्त झाल्याबद्द्ल भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, महिला आघाडी शहर अध्यक्ष कविता उरकुडे, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, लता लाटकर, निताताई उंदीरवाडे, अलका पोहनकर, रोशनी बानमारे, कोमल बारसागडे, तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले.