सलिम बुधवानी यांची राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांंक विभागाच्या प्रदेश महासचिवपदी नियुक्ती

69

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सलिम बुधवानी यांची पक्षाच्या अल्पसंख्यांंक विभागाच्या प्रदेश महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांंक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ऍड. मोहम्मद खाँ पठाण यांनी बुधवानी यांची नियुक्ती केली आहे. बुधवानी हे अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून, त्यांचा दांडगा जनसंपर्क बघता पक्ष मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास मोहम्मद खाँ पठाण यांनी व्यक्त केला आहे.

सलिम बुधवानी यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंधारणमंत्री जयंत पाटील, प्रदेश महासचिव प्रवीण कुंटे, आमदार धर्मरावबाबा आत्राम, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांना दिले आहे. नियुक्तीबद्दल हितचिंतक आणि मित्रमंडळींनी सलिम बुधवानी यांचे अभिनंदन केले आहे.