गडचिरोली जिल्हा शिवसेनेच्या ताफ्यात वाहन दाखल ; दुर्गम भागात शिवसेनेच्या जनसंपर्क व संघटनबांधणीला येणार वेग !

90

– शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांचा पुढाकार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शिवसेने पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे व जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्हयात शिवसेनेची पाळेमुळे पसरत असून जनसंपर्क आणि पक्षाची ताकद वाढत आहे. शिवसैनिक गावागावात जाऊन पक्षाची ध्येयधोरण नागरिकांना पटवून कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडत आहेत. वाहनाच्या अभावामुळे ग्रामीण भागात जनसंपर्क वाढीस अडचण निर्माण झाली होती. मात्र आता ही अडचण शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या पुढाकाराने दूर झाली असून पक्षाच्या कामासाठी वाहन खरेदी केले. आता शिवसेनेच्या ताफ्यात नवीन कोरे वाहन दाखल झाले आहे. पक्षाच्या सेवेसाठी वाहन उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागात शिवसेनेची संघटनबांधणी वाढणार असून जनसंपर्काला वेग येणार आहे.
गडचिरोली जिल्हयाचा विस्तार मोठा असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊ न ग्रामीण भागात जनसंपर्कासाठी जाण्यासाठी पक्षाकडे वाहन उपलब्ध नव्हते. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गैरसोय होऊन अडचनीचा सामना करावा लागत होता. अशा स्थितीत सुध्दा शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांचा आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ग्रामीण भागात जनसंपर्क सुरूच आहे. मात्र आता आठ ते दहा कार्यकर्त्यांना बसण्याची आसन क्षमता असलेले हक्काचे वाहन उपलब्ध झाल्याने प़क्षाच्या कामासाठी मोठी मदत होणार आहे. हे वाहन सदैव पक्षाच्या सेवेत राहणार असून वेळप्रसंगी जनतेच्या सेवेसाठी सुध्दा या वाहनाचा उपयोग होणार आहे.
वाहनाअभावी कार्यकर्त्यांना अडचनीचा सामना करावा लागता होता. दुर्गम भागात जाऊन जनसंपर्क वाढविण्यासाठी वाहनाची कमतरता होती. ही उणिव दूर करण्यासाठी पक्षाच्या कार्यासाठी सदैव एक वाहन तैनात असावे ही बाब लक्षात घेऊन पक्ष नेतृत्वाकडे वाहनाची मागणी न करता पक्षाचा एक कट्टर शिवसैनिक व जनतेचा सेवक म्हणून स्वत वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता प़क्ष कार्यासाठी शिवसैनिकांच्या सेवेत वाहन दाखल आहे. वाहन उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागात जाऊन शिवसेनेची संघटशक्ती मजबूत करण्याबरोबरच जनसंर्पकाला गती मिळणार आहे, अशी भावना शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांनी व्यक्त केली आहे. याप्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख किशोर पोतदार, शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार, सहसंपर्क प्रमुख विलास कोडापे, जिल्हा संघटक विलास ठोंंबरे, गडचिरोली विधानसभा जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके, यादवजी लोहबरे, संजय बोबटे, नवनाथ ऊके, संदीप भुरसे, स्वप्निल खांडरे, नानाजी कालबंधे, संदीप अलबनकर, राहिल सोरते, अरुण बारापात्रे, निकेश लोहबरे, माणिक ठाकरे, अरुण पिलारे, स्वप्निल ढोढरे, दिवाकर खड़कते, राजेश ठाकरे, जगन चापले उपस्थित होते.