कैकाडी वस्तीसह शिवनगर येथे गडचिरोली नगर परिषदेने व जिल्हा प्रशासनाने आवश्यक मुलभूत सोयीसुविधा त्वरित निर्माण करा : माजी आमदार तथा प्रदेश महासचिव डॉ. नामदेवराव उसेंडी

139

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली शहरातील कैकाडी नागरिकांंच्या वस्तीसह शिवनगर येथील नागरिकांना मुलभूत गरजापासूून वंचित ठेवून गडचिरोली नगर परिषद या नागरिकांंवर अन्याय करीत आहे. तरी प्रशासनाने आवश्यक मुलभुत सोयीसुविधा त्वरित निर्माण करुन द्याव्यात, अशी मागणी माजी आमदार, सदस्य जिल्हा नियोजन समिती तथा प्रदेश महासचिव डाॅ. नामदेवराव उसेंडी यांनी केली आहे. केंद्र व राज्य शासनाची दरवर्षी जिल्हयातील नागरिकांंच्या विकासाकरिता करोडो रुपयांंचा विकास निधी गडचिरोली नगर परिषदेला व जिल्हा प्रशासनाला पाठवित असूनही गडचिरोलीतील रहिवासी असलेल्या कैकाडी समाजाच्या नागरिकाच्या विकासावर एकही पैसा खर्च न करता येथील नागरिकांना मुलभूत सुविधेपासून वेटीस धरले आहे. कैकाडी नागरिकांना काॅस्ट सर्टिफिकेट, अंगणवाडी केंद्रासह, प्राथमिक शाळा, राहावयास घरकुले, जाण्या-येण्याकरीता रस्ते, नाल्याचे बांधकामे, नळाचे शुध्द पिण्याचे पाणी, निरोगी व स्वच्छ जीवनाकरिता शौच्छालये, पंतप्रधान उज्वला योजने अंतर्गत गॅस कनेक्शन, संपूर्ण नागरिकांना रेशनकार्ड, निराधार लोकांना अनुदान, युवक युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षणासह बँँक लोन या सारख्या मुलभूत सुविधेपासुन वंचित ठेवल्याने समाजाचा विकास खुंटला असून या समाजाचा एकही मुलगा ग्रॅज्युएट झालेला नाही. एकही मुलगा नोकरीवर लागलेला नाही. दारिद्रयात जीवन जगत असलेल्या मागासवर्गीय कैकाडी नागरिकांच्या मुलभूत समस्या साडेविण्याचे निवेदन मा. पंतप्रधान महोदयासह महाराष्ट्र शासन, प्रशासन व गडचिरोली जिल्हा प्रशासनास काँँग्रेस पक्षाने सादर करताच कैकाडी नागरिकांच्या भयान वस्तुस्थितीची तात्काळ दखल पंतप्रधान कार्यालय नवी दिल्लींनी घेतली असून कार्यालय नवी दिल्लीचे दिनांक 22/11/2018 व दिनांक 20/3/2019 च्या पत्रान्वये महाराष्ट्र शासन प्रशासनास कैकाडी नागरिकांच्या मुलभूत समस्या त्वरित निकाली काढल्याचे कळवून सुध्दा ग्राउंड लेव्हलवर प्रत्यक्ष कार्य करणा-या नगरपरिषद गडचिरोली व गडचिरोली जिल्हा प्रशासनांनी मा. पंतप्रधान महोदयांंच्या पत्राची दखल घेतली नसून अजुनही नागरिकांच्या समस्या निकाली काढल्या नाहीत व गडचिरोली नगर परिषद व जिल्हा प्रशासन सुस्त आहे. कैकाडी वस्तीच्या व शिवनगर येथील नागरिकाच्या समस्याची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांचे समस्या जाणून घेतल्याघेतल्या माजी आमदार तथा प्रदेश महासचिव डाॅ. नामदेवराव उसेंडी, काँँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, रोजगार व स्वयंरोजगार सेलचे अध्यक्ष काशिनाथ भडके, ओबीसी सेलचे अध्यक्ष पांडूरंगजी घोटेकर, बंटी करगामी, पंकज खोबे यांनी प्रत्यक्ष भेट देवून गंभीर अवस्थेत जीवन जगत असलेल्या परिस्थितीची पाहणी करुन नागरिकांना मार्गदर्शन केले, व देशाच्या सन्माननिय प्रधानमंत्री कार्यालय नवी दिल्लीच्या आदेशाचे जिल्हा प्रशासन पालन करीत नसल्याबाबत दुःख व्यक्त करुन कैकाडी वस्तीसह शिवनगर येथील मुलभूत समस्या त्वरीत सोडविण्याची मागणी करण्यात आली. त्यावेळी कैकाडी समाज सुधार समितीचे अध्यक्ष राजकुमार गायकवाड, कार्याध्यक्ष शंकर जगन्नाथ, उपाध्यक्ष गोपाल जगन्नाथ, कोषाध्यक्ष रमेश खंडेलवार, सचिव दानियाल खंडेलवार, सहसचिव सारय्या कुभांरे, सदस्य विजय दासरवार, नागेश जगन्नाथ, महेंद्र केदारी, सह शिवनगराचे दिवाकर खोब्रागडे, सुकदेव बावणे, मंगल लोणारे, प्रशांत मदनकर, ओमप्रकाश कोलते सह कैकाडी वस्तीतील व शिवनगर येथील महिला व पुरुष नागरीक मोठया संख्येेने उपस्थित होते.