गडचिरोली शहरात “एक तास राष्ट्रवादी काँग्रेस” अभियान यशस्वी

87

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून “एक तास राष्ट्रवादी काँग्रेस” अभियान राज्यभर राबविण्याचा आवाहन केले असून त्या उपक्रमाची अमलबजावणी गडचिरोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष विजय गोरडवार यांच्या नेतृत्वात राबविण्यात आले असून, संपूर्ण गडचिरोली शहरात एकूण पाच प्रभागात बैठका घेण्यात आली असून, रामनगर, शाहूनगर, हनुमान मंदिर प्रभाग, झाशीराणी नगर प्रभाग आणि गोकुळनगर प्रभागात संपूर्ण दिवसभर हा अभियान राबविण्यात आला. यावेळी विजय गोरडवार यांनी प्रत्येक नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून पक्षाचे ध्येय धोरण सांगून पक्ष बळकटी करता सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले असून लवकरच राष्ट्रवादी काँगेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मंत्री तथा अहेरी विधान सभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा दरमहा गडचिरोली शहरात जनता दरबार भरवून सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही यावेळी सांगण्यात आले. या अभियानाप्रसंगी संध्या उईके माजी नगरसेविका, मिनल चिमुरकर माजी नगरसेविका, कपिल बागळे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस गडचिरोली, निता बोबाटे महिला तालुकाअध्यक्ष, ज्ञानेश्वर ब्राम्हनवाडे, यादवराव करंडे, अतुल हजारे, सुषमा येवले, राजीराम जुवारे, दुधराम महागणकर, सुरेखा बलमवार, ललिता ब्राम्हणवाडे, अमर खंडारे, रेखा सहारे, संजय भसारकर, नईम शेख,भास्कर निमजे, मल्लया कालवा, नितीन पिपरे, रवी सोनटक्के, संपूर्ण प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.