गडचिरोली शहरातील शाहूनगरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा संपन्न

86

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्थानिक गडचिरोली शहरातील शाहूनगर प्रभागात नुकताच ६ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता संत नगाजी महाराज देवस्थान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा पार पडला. सदर मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गडचिरोली शहर अध्यक्ष विजय गोरडवार यांच्या नेतृत्वात घेण्यात आला असून या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रविंद्र वासेकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे होते. तर विशेष अतिथी म्हणून युनुस शेख प्रदेश संघटन सचिव हे होते. विजय गोरडवार, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, शहर कार्याध्यक्ष कपिल बागळे, माजी नगरसेविका तथा राकाँपा शहर अध्यक्षा मिनल चिमुरकर, तालुका महिला अध्यक्षा निता बोबाटे, चामोर्शी तालुका महिला निरीक्षक आरती कोल्हे, स्मिता ठाकरे, युवा शहर अध्यक्ष अमोल कुळमेथे, प्रा. चंद्रशेखर गडसुलवार, अमर खंडारे, संजय भसारकर, रमेश सहारे, रेखाताई सहारे, उमाताई बंन्सोड, अजय कुकडकर, महीला जील्हा सचिव रेखाताई कोराम, सुधीरभाऊ आखाडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. सर्वप्रथम संत नगाजी महाराज यांच्या मूर्तींचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना रविंद्र वासेकर असे म्हणाले की, राष्ट्रवादी काँँग्रेस पक्ष विजय गोरडवार यांच्या नेतृत्वात शहरात मजबूत होत असून कार्यकर्त्यांंनी त्यांनाअधिक सहकार्य करावे, शहरातील कानाकोपऱ्यात राष्ट्रवादी काँँग्रेस पक्ष मजबूत करून शहरात अव्वल नंबरचा पक्ष निर्माण व्हावा, आगामी काळात नगर परिषद निवडणुक होणार असून, पक्षाची सत्ता नगरपालीकेत प्रस्थापित व्हावी या दिशेने कार्यकर्त्यांंनी कामाला लागावे, असेही आवाहन केले. त्यांच्या समवेत युनुस शेख, विजय गोरडवार यांचेही भाषणे झाली. प्रास्ताविक अमर खंडारे यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल कुळमेथे व संपुर्ण सूत्रसंचालन संजय भसारकर यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता संभाजी मेश्राम, वसंत मेश्राम, उमाकांत रामटेके, शेखर मेश्राम, आकाश सहारे, प्रज्वल टेंभूर्ण, ज्योती भसारकर, लीना ढोलने, बेबी उंदीरवाडे, कुंभारे, लता शेंन्डे, चव्हाण, सागर उरकुडे, रत्नावार, रिनू कत्रोजवार, जेरिना पठान, पुष्पा सहारे, मंजुषा पातर, अर्चना कुळवे, बोबाटे, किरण राघुसे, उषा तिवाडे, माधुरी पोचाडे, सविता मने यांनी परिश्रम केले. यावेळी सदर मेळाव्याला युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तथा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.