खा. अशोक नेते यांच्या हस्ते गडचिरोलीत पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

68

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथे काल खासदार अशोक नेते यांच्या हस्ते पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी एका लहान बालकाला खासदार अशोक नेते यांच्या हस्ते पल्स पोलिओचा डोज देऊन या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळवे, महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोयाम व अन्य वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका उपस्थित होते.
संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आजपासून पोलिओ डोज देण्यात येत आहे. तरी 0 ते 5 वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओचा डोज देण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.