खा. अशोक नेते यांनी घेतले मार्कंडेश्वराचे दर्शन

98

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी आज 1 मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्त मार्कंडादेव येथे जाऊन मार्कंडेश्वराचे दर्शन घेतले व पूजा- अर्चा करून आरती केली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, मार्कंडा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजाननराव भांडेकर, ओबीसी मोर्चाचे जिल्हा महामंत्री भास्कर बुरे, राकेश राचमलवार, स्वीय सहाय्यक रवींद्र भांडेकर, जयराम चलाख, चामोर्शीचे तहसीलदार, पोलीस अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी मार्कंडा देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष गजाननराव भांडेकर यांच्या हस्ते खासदार अशोक नेते यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी खासदार अशोक नेते यांनी मार्कंडा देवस्थानच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून निधी खेचून आणण्याचे आश्वासन दिले.