सामाजिक कार्यकर्ते मून दाम्पत्यांचे कार्य कौतुकास्पद : नगराध्यक्ष योगीताताई पिपरे

221

– कोरोनामुळे छत्र हिरावलेल्या कल्याणीला दत्तक घेवून स्वीकारले पालकत्व

– पारडी गावामध्ये संपूर्ण रितीरिवाजानुसार पार पडला कल्याणीचा विवाह सोहळा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कोरोनाने आई-वडिलांचे छत्र हिरावलेल्या व निराधार झालेल्या कल्याणीला सामाजिक कार्यकर्ते मून दाम्पत्यांंनी दत्तक घेऊन पालकत्व स्वीकारले. आज कल्याणीचा विवाह रचून कन्यादान करून सामाजिक दायित्व निभावलेल्या मूून दाम्पत्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी केले आहे.
भामरागड येथील रहिवाशी श्रीकांत कैलास मोडक हे आपल्या पत्नीसह लक्ष्मी मोडक व मुलगी कल्याणी मोडक हिच्यासह मिळेल तो रोजगार करून उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान, मार्च २०२१ रोजी कल्याणीच्या घरातील चार सदस्य कोरोना बाधित आढळून आले. ५ एप्रिलला कल्याणीच्या आजीचा मृत्यू झाला. तर १३ एप्रिलला कल्याणीचे वडिलही कोरोनाने मृत्युमुखी पडले. २८ एप्रिलला कल्याणीच्या आईचा सुद्धा कोरोनाने मृत्यू झाला. एकाच महिन्यात आईवडील व आजीचा मृत्यू झाल्याने कल्याणीवर आभार कोसळले. घरातील सर्वच जण मरण पावल्याने ती अनाथ झाली.
अशातच गडचिरोलीचे सामाजिक कार्येकर्ते विवेक मूून व त्यांची पत्नी ग्रीष्मा मून यांनी कल्याणीला दत्तक घेवून तिचे पालकत्व स्वीकारले. कल्याणीचे विवाहाचे वय झाल्यामुळे तिच्यासाठी मूून दाम्पत्यांनी वर शोधणे सुरु केले. स्थानिक गोकुलनगर येथील भीमराव भैसारे यांच्यासोबत कल्याणीचा विवाह पक्का झाल्याने गडचिरोली जवळील पारडी गावामध्ये ९ जानेवारी रोजी संपूर्ण रितीरिवाजानुसार कल्याणीचा विवाह पार पडला. नवदाम्पत्यांना शुभआशीर्वाद देण्यासाठी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे आवर्जुन उपस्थित होत्या, यावेळी त्या बोलत होत्या. तसेच जिल्ह्यातीलल इतरही सामाजिक कार्यकर्त्यांनी कोरोना महामारीने निराधार झालेल्या मुलांना दत्तक घेवून पालकत्व स्वीकारावे, असा संदेशही नगराध्यक्ष यांनी यावेळी दिला. आशीर्वाद देण्यासाठी भाजपा जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोदजी पिपरे, सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार रोहिदास राऊत, संजय निखारे, वासुदेव शेडमाके, प्रतिष्ठित नागरिक, वधूू-वर पक्षाकडील आप्तेष्ट नातेवाईक मंडळी तसेच पारडी गावातील नागरिक आवर्जुन उपस्थित होते.