विद्यापीठ विधेयक कायद्याच्या निषेधार्थ महाविद्यालयात बँनर लावून व मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून महाविकास आघाडी सरकारचा केला निषेध

139

– भाजयुमोची महत्वपूर्ण बैठक संपन्न

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा गडचिरोलीची बैठक भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष किसन नागदेवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूर्व विदर्भ समन्वयक तथा प्रदेश उपाध्यक्ष वामन तुरके, भारतीय जनता युवा मोर्चा गडचिरोली जिल्हा प्रभारी तथा प्रदेश सचिव अनिल डोंगरे, गडचिरोली जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सदस्य स्वप्निल वरघंटे, प्रदेश सोशल मीडिया प्रमुख आनंद खजांजी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत विद्यापीठ विधेयक कायद्याच्या निषेधार्थ महविकास आघाडी सरकारच्या विरोधात प्रदेशानी दिलेल्या कार्यक्रमावर सविस्तर चर्चा करण्यात आली व विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक मागे घ्या अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. तसेच महाविद्यालयात जाऊन बॅनर पोस्टर लावण्यात आले.
बैठकीला जिल्हा अध्यक्ष किसन नागदेवे, वामन तुरके, अनिल डोंगरे यांनी संघटनात्मक विषयावर आंदोलन यशस्वी करण्यासाठी ताकदीने कार्य करा असे सांगितले.
प्रास्तविकातून जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये यांनी आगामी कार्यक्रम आंदोलन यांची माहिती दिली.
यावेळी भाजयुमो महामंत्री भारत बावणथडे, जिल्हा महामंत्री संजय बारापात्रे, विद्यार्थी विभाग संयोजक आशिष कोडापे, गडचिरोली शहर अध्यक्ष सागर कुंभरे, भाजयुमो सोशल मीडिया प्रमुख अनुप अध्येकींवार, शहर महामंत्री हर्षल गेडाम, कुरखेडा तालुका अध्यक्ष विनोद नागपूरकर, आरमोरी अध्यक्ष पंकज खरवडे, वडसा अध्यक्ष सचिन खरकाटे, सचिन वानखेडे, अमोल खेडकर, अतुल मंगेश, रणदिवे, मंगेश मांडवे, उल्हास देशमुख, रामचंद्र वरवाडे, चेतन गोरे, पवन येरमे, प्रतिक राठी, कोरचीचे रवींद्र बनसोड, कार्तिक काशीवार भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विनोद नागपूूरकर तर आभार प्ररदर्श भारत बावनथडे यांनी केले.