बेलगाव येथे शिवगर्जना सांस्कृतिक कला मंचच्या सौजन्याने ‘आशीर्वाद’ नाटकाचे आयोजन

131

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील बेलगाव येथे शिवगर्जना सांस्कृतिक कला मंच बेलगाव यांच्या सौजन्याने “आशीर्वाद” या नाटकाचे आयोजन 24 डिसेेंबर रोजी करण्यात आले होते. वर्षभर शेतकरी शेतात राबतो. शेतातील पिकांची मळनी होताच ग्रमीण भागात जनतेच्या मनोरंजनासाठी संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यांच्याच एक भाग म्हणून बेलगाव येथे शिवगर्जना सांस्कृतिक कला मंच बेलगाव यांच्या सौजन्याने “आशीर्वाद” या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाचे अध्यक्ष शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ. विभाष मंडल, रंगारी साहेब, यादवजी लोहबरे, आकाश मड़ावी, विनोद दुगा, विष्णुपंत मसराम, विद्याताई दुगा, डॉ. भूषण ताराम, रंजीताताई पेंदाम, नीलेश होळी, गंगाधर राऊत, तसेच शिवगर्जना सांस्कृतिक कला मंच बेलगावचे सदस्य वाल्मीक भांडेकर, रोशन धोडरेे, विलास वासेकर, कृष्णा वासेकर, गणेश भांडेकर, आशीष जुवारे, लोमेश भांडेकर, अंकुश जुवारे, अरविंद भांडेकर, पत्रुजी चापले, राजेन्द्र कुकुड़कर, चनुजी तोफा, गजानन भांडेकर, विट्ठल धोडरे, विजय भुरसे, आशीष नैताम, प्रफुल्ल भुरसे यांच्यासह गावकरी मंडळी मोठ्या संख्याने उपस्थित होते.