– दिभना येथे माळी समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे आचार व विचार अंगीकृत करुन समाजात त्यांचे विचार रुजवावे, असे प्रतिपादन गडचिरोली पंचायत समिती उपसभापती विलास केशवराव दशमुखे यांनी केले.
माळी समाज संघटना दिभनाच्या वतीने आई सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाचे आयोजन केले होते यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होतो. सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजातील जुन्या रुढी, परंपरांना बगल देत कसलीही पर्वा न करता महिला समाजात कशा येतील यासाठी महिलांची शाळा काढली. त्याचेच प्रतिक आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. अशा महान प्रथम शिक्षीका यांची जयंती दिभना येथे होत आहे ही अभिनंदन बाब आहे. त्या सोबत सर्व समाजाला घेवुन ही जयंती होत असल्याने माळी समाजाचे अभिनंदन उपसभापती दशमुखे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे हे होते तर प्रमुख अतिथी सभापती मारोतराव ईचोडकर, पं. स. सदस्य रामरतन गोहणे, नेताजी गावतुरे, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, जेष्ठ नेते बालाजी पा. जेंगठे, सरपंच रमेश गुरनुले, उपसरपंचा उषाताई चौधरी, ग्रामपंचायत सदस्य गुणवंत जम्बेवार, ग्रामसेवक श्रीमती वासंती देशमुख, ग्रामपंचायत सदस्य राजु जेंगठे, धनराज जेंगठे, ज्योती जेंगठे, ज्योती नैताम, चंदाताई जेंगठे, मुख्याध्यापिका शिवणकर, नारनवरे, तंटामुक्ती अध्यक्ष वषाँताई गुरनुले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दामोधर गुरनुले आदी उपस्थितीत होते.
यावेळी प्रशांत वाघरे, मारोतराव ईचोडकर, नेताजी गावतुरे यांनी विचार प्रगट केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार सौ. जेंगठे यांनी मानले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी माळी समाजाचे अध्यक्ष योगेश जेंगठे, पांडुरंग गावतुरे, विलास जेंगठे, मुन्ना जेंगठे, डिमराज गुरनुले, सुनील जेंगठे यांनी प्रयत्न केले.