विजयदिन सोहळ्याला आदिवासी गोंडगोवारी समाज बांधव एकवटले

103

– मोहटोला येथे कार्यक्रमाचे आयोजन, हजारो समाजबांधवाची उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सर्वोच्च न्यायालयाने 18 डिसेंबर 2020 रोजी आदिवासी गोंडगोवारी समाजाच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे हा दिवस विजयदिन म्हणून साजरा केला जातो. आदिवासी गोंडगोवारी समाज कोपा बहुउदेशिय समाज संघटनेच्या वतीने गडचिरोली तालुक्यातील मोहटोला येथे आदिवासी गोंडगोवारी कोपा समाजाचा विजय दिन सोहळा तथा समाजप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी गोंडगोवारी समाज बांधव मोठया संख्येने एकवटले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार होते तर अध्यक्षस्थानी प्रकाश होळी साहेब होते.
आदिवासी गोंडगोवारी समाजाला ऐतिहासीक पार्श्वभूमी लाभली आहे. या समाजाची लोकसंख्या गडचिरोली व गोंदिया जिल्हयात एक लाखापेक्षा अधिक आहे. या समाजाची संस्कृती, बोलीभाषा, देवीदैवत प्राचीन आहे. गोंडी व छत्तीसगडी ही या समाजाची बोलीभाषा आहे. गडचिरोली जिल्हयातील कुरखेडा, कोरची, आरमोरी, एटापल्ली, भामरागड आणि धानोरा या तालुक्यात हा गोंडगोवारी समाज मोठया प्रमाणात आहे. गोवारी समाज आदिवासी असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता. उच्च न्यायालयाच्या निर्णया विरोधात राज्य शासन अनुसूचित जमाती आयोगा व गोंडगोवारी समाज संघटनेच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या तिन्ही याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात एकत्रीत सुनावनी झाली. आदिवासी गोंडगोवारी व गोवारी या दोन भिन्न जाती असून गोवारी समाज हा आदिवासी नाही असा महत्वपुर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 18 डिसेंबर 2020 रोजी दिला. सर्वोच्च न्यायालयाने आदिवासी गोंडगोवारी समाजाच्या बाजूने निर्णय दिल्याने आदिवासी गोंडगोवारी बहुउद्देशिय समाज संघटना मोहटोलाच्या वतीने 18 डिसेंबर हा दिवस विजय दिन म्हणून साजरा करण्यात आला.
उद्धघाटनीय भाषणात बोलताना अरविंदभाऊ कात्रटवार शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य म्हणाले, आदिवासी गोंड़गोवारी समाज विकासापासून वंचित आहे. मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वातील सरकार गोरगरीबाच्या कल्याणासाठी विविध योजना राबवित आहेत. गडचिरोली जिल्ह्यला मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या रुपात विकासाचा द्यास असलेले पालकमंत्री लाभले आहेत. गोंड़गोवारी समाजाच्या समस्या मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्यापर्यंत पोहचवून समस्या सोडविन्यात येतील. आदिवासी गोंड़गोवारी समाजाच्या विकासासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध आहे, असेही अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित कार्यक्रमाचे उद्धघाटक शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार, सहउद्घाटक गोंडगोवारी कोपा अध्यक्ष जीवन पाटील उसेंडी, प्रकाश होळी, सुधाकर कुळमेथे, एम. जे. कुमरे सेवानिवृत्त अधिकारी, ताराम, समाजसेवक प्रकाश मड़ावी, आर. ड़ी. आत्राम, ताडाम, यादवजी लोहबरे, गजानन होळी, माधव भुरसे, बाबूराव चापले, निरचन्द लोहबरे, मोतीराम भुरसे, अशोक कुंनघड़कर, नवनाथ लोहबरे, टीकाराम झोड़े, मंगरु कुकुड़कर, रवींद्र मिसार, जगन चापले, विनोद चापले, बापुजी लोहबरे तथा समाजबांधव मोठ्या संख्याने उपस्थित होते.