पंतप्रधान आवास योजना लाभार्थ्यांना नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते भोगवटा प्रमाणपत्राचे वितरण

78

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी भारत देशाला स्वतंत्र होवून ७५ वर्ष पूर्ण झाल्याने दि.१७/६/२०१५ ला पंतप्रधान आवास योजनेचा शुभारंभ करण्यात आला असुन २०२२ पर्यंत देशातील प्रत्येक गरीब परिवाराला स्वताचा पक्का घर देण्याचा मा. नरेंद्रजी मोदी यांचा संकल्प पूर्ण होत आहे.
*गडचिरोली शहरात सुध्दा गोकुलनगर,स्वामी विवेकानंदनगर, फुले वार्ड, हनुमान वार्ड, सर्वोदय वार्ड व गांधी वार्ड येथे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून १५१९ घरकुल मंजूर झालेले असुन १५० घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेले आहेत. तर उर्वरित घरकुलांचे बांधकाम सुरू आहे.
ज्यांचे घरकूल बांधकाम पूर्ण झालेले आहे. अशा घरकूलधारक लाभार्थ्यांना गडचिरोली नगरपरिषदकडून भोगवटा प्रमाणत्राचे वितरण नगराध्यक्ष योगीताताई पिपरे व ईतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
लाभार्थी प्रदिप नामदेव पिलीवार, निरंजना प्रकाश काटवे, जैवंता विठोबा दिवटे, हेमलता मनोहर आवारी, देवाजी किसन चुधरी, नितीन विजय टिंगुसले तसेच ईतर १०० घरकूल लाभार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
यावेळी न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पाणीपुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे, भाजपा जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोद पिपरे, नगरसेविका वैष्णवीताई नैताम, लाताताई लाटकर, निताताई उंदिरवाडे, सामाजिक कार्यकर्ते देवाजी लाटकर, विलास नैताम, पंतप्रधान आवास योजना MIS तज्ञ ब्रम्हानंद काळे, स्थापत्य अभियंता निकेश गहाने व लाभार्थी उपस्थित होते.