सामान्य ज्ञान स्पर्धा परिक्षेचे बक्षीस वितरण

99

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शहरातील इंदिरानगर येथे १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने तथागत बौद्ध समाज मंडळ, इंदिरानगरतर्फे ६ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर परिक्षेला इंदिरानगर येथील बहुसंख्य विद्यार्थी सहभागीं होऊन परिक्षा दिली. स्पर्धा परिक्षेत सहभागी विद्यार्थी व गुणवंत प्राप्त विदयार्थी यांचा गौरव करण्या करिता बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिवाकर उंदिरवाडे, हितेंद्र गेडाम, सुरेश खोब्रागडे, रविंद्र उराडे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विदयार्थ्यांना आकर्षक बक्षिस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सामान्य ज्ञान स्पर्धा परिक्षा व बक्षिस वितरण कार्यक्रम आयोजीत करणे व यशस्वी करण्यासाठी सचिन पाटील, सतीश भानारकर, शेषराव तुरे, बंडू के. खोब्रागडे यांनी परिश्रम घेतले.