– आमदार डॉ. देवरावजी होळी, लोकसभा समन्वयक इंजि. प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री योगीताताई पिपरे यांच्या हस्ते लेआऊटचे उद्घाटन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : विद्या विहार कॉन्व्हेंटच्या व मूकबधिर शाळेच्या मागे मुडझा रोड नवेगाव (मुरखळा) गडचिरोली येथिल साईनगर रेसिडेन्सी (NATP) भव्य लेआऊटचे रामनवमीच्या शुभपर्वावर आमदार डॉ. देवरावजी होळी, भाजपा लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे व जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले.
शुभारंभप्रसंगी आयोजक अनुरागजी पिपरे, दिनेश भुरसे, शुभम हेडाऊ, संजयजी मांडवगडे, रंजिताताई कोडाप, पल्लविताई बारापात्रे, पुनमताई हेमके, अर्चनाताई चन्नावार, अभिलाष कुनघाडकर, प्रतीक मेश्राम, अमित भुरसे, अरविंद आत्राम, सागर पिपरे, लोकेश कुलमेथे, अमन बारापात्रे, अमन सय्यद आदी उपस्थित होते.





