लॉयड्स कालीअम्मल हॉस्पिटल हेडरी येथे रक्तदान शिबिर

24

– संचालक बि. प्रभाकरन यांच्यासह 50 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिराेली : लॉयड्स कालीअम्मल मेमोरियल हॉस्पिटल हेडरी येथे लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडद्वारे 20 एप्रिल 2024 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले हाेते.

या शिबिरात सर्वप्रथम लॉयड्सचे व्यवस्थापकीय संचालक  बि. प्रभाकरन यांनी रक्तदान केले. त्यानंतर लॉयड्स कंपनीचे 50 अधिकारी आणि कर्मचारी यांनी सुद्धा रक्तदान केले. सर्व समुहातील सदस्यांनी दर महिन्याला किमान 50 युनिट रक्त देण्याचे आश्वासन दिले आणि ते आजारी व्यक्तीला उपयोगात पडेल, असा उद्देश ठेवला असून लॉयड्स टीम ही मोलाची कामगिरी करीत आहे.

एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासी व नक्षल प्रभावीत सुरजागड परिसरात मुलभूत आरोग्य सुविधा मिळणे ही कठीण होते. पण परिसरातील आदिवासींना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळण्याकरिता लॉयड्स मेटल्स कंपनीच्या पुढाकाराने हेडरी येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे कालीअम्मल हॉस्पिटल सुरू केले आहे. त्यामुळे या परिसरातील आदिवासी, गरीब व गरजूंना मोठा आधार मिळाला आहे. या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी 24/7 तास रुग्ण सेवा देत आहेत.

लॉयड्स कालीअम्मल मेमोरियल हॉस्पिटल 8 नोव्हेंबर 2023 ला सामान्यांच्या सेवेत कार्यन्वीत झाले. या ठिकाणी दहा तज्ज्ञ डॉक्टर 40 हुन अधिक आरोग्य कर्मचारी परिसरातील नागरिकांना मोफत आरोग्य सेवा देत आहेत. या हॉस्पिटलमध्ये सुरजागड, हेडरी, गट्टा, जांभिया, एटापल्ली, भामरागड, आलापल्ली, अहेरीसह गडचिरोली जिह्यातील दररोज शेकडो रुग्ण मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेताना दिसत आहेत.