एकाच मंडपात 127 जोडप्यांना बांधल्या रेशीमगाठी

50

– गडचिरोली पोलिस विभाग व मैत्री परिवाराच्या पुढाकाराने अभिनव लॉनमध्ये आदिवासी युवक – युवतींचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न

– 8 आत्मसमर्पित नक्षल जोडप्यांंचा सहभाग

वासी जोडपी होणार विवाहबद्ध

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली पोलिस दल, पोलिस दादालोरा खिडकी आणि मैत्री परिवार संस्था नागपूर व गडचिरोली शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 26 मार्च रोजी स्थानिक चंद्रपूर मार्गावरील अभिनव लॉन येथे भव्य सामूहिक विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला.

या विवाह सोहळ्यात 8 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसह 127 आदिवासी युवक-युवतींंना रेशीमगाठी बांधण्यात आल्या. विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी व नागरिकांनी उपस्थिती दर्शवून नवदाम्पत्यांना शुभाशिर्वाद दिला. या मेळाव्यात नवदाम्पत्य, नातेवाईक व नागरिकांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. या सामूहिक विवाह मेळाव्यासाठी विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य केले.