मानापूर (देलनवाडी) येथे रामनवमीनिमित्त श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन

21

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : 24 मार्च 2023 रोजी मौजा मानापूर (देलनवाडी) ता. आरमोरी जि. गडचिरोली येथे रामनवमीनिमित्त आयोजित श्रीमद् भागवत सप्ताहाचे उद्घाटन व दीप प्रज्वलन (घटस्थापना) प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान उपस्थित होते. यावेळी मंचावर उपस्थित किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, आरमोरी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष दिलीप घोडाम, चौधरी, प्रा. राजनहिरे, नरवरे, बावनकर, तुलसीदास काशीकर, दिघेश्वर धाईत, स्वप्निल ताडाम, नामदेवजी वाटघरे, नामदेवजी यादनकर, ऋषीजी चौधरी, मंडळाचे अध्यक्ष भाईचंदजी गुरनुले, उपाध्यक्ष हस्तक महाराज, सचिव मोटघरेजी व गणमान्य मंडळी व भाविक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.