मा. पक्ष प्रमुख उध्दव साहेब ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात एकवटले शिवसैनिक

91

– शेकडो शिवसैनिकांनी स्टँपपेपरद्वारे समर्थन लिहून देत शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांना केले सुपूर्द

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : हदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना ही कट्टर शिवसैनिकांची आहे. शिवसेनेचा जन्मच संघर्षातून झाला असून कितीही संकटे आली तरी आम्ही डगमगणार नाही. गडचिरोली जिल्हयातील आम्ही शिवसैनिक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे आधारवड समर्थन गडचिरोली येथील शिवसैनिकांनी शिवसेना पक्ष प्रमुख मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांना स्टॅम्पपेपरद्वारे लिहून दिले. शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दव साहेब ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवसैनिक एकवटले. मा. उध्दव साहेब गडचिरोली येथील आम्ही शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहोत असे समर्थन स्टँपपेपरद्वारे लिहून देत शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांना सुपूर्द केले. शिवसेनेत बंडखोरी झाल्याने पक्षात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बंडखोरांमुळे पक्षावर संकट आले असतानाही राज्यातील शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. गडचिरोली येथील शिवसैनिकांनी सुध्दा पक्षाप्रती असलेली निष्ठा दाखवून देण्यासाठी स्टॅम्पपेपरद्वारे समर्थन जाहीर केले. आम्ही मा. बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असून कोणत्याही भुलथापांना बळी पडणार नाही. गडचिरोली जिल्हयात शिवसेना अधीक मजबुत करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक महत्वपुर्ण योगदान देईल, असा मनोदय शिवसैनिकांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार, सहसंपर्क प्रमुख विलास कोडापे, उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे, नवनाथ ऊके, संजय बोबाटे, नानाजी काळबाधे, संदीप भुरसे, सुरज उइके, संदीप अलबनकर, निरंजन लोहबरे, स्वप्निल खांडरे, निकेश लोहबरे, राजू जवादे, अरुण बारापात्रे, हरबा दाजगाये, सुमित सोनटक्के, तानबा दाजगाये, गोपाल मोगरकर, रामजी भांडेकर, उमाजी शिवनकर, नेताजी आलम, शालिक कोवाची, सचिन निलेकर, दिलीप वलादे, निकेश मड़ावी, रविंद्र मिसार, गोपाल पानसे, महेश झोड़े, रामचंद्र बह्यल, अमित हुलके, सचिन सेलोते, सूरज टेकाम, राहुल मड़ावी, अभिषेक सेलोते, आशीष शेडमाके, सूरज शेंडे, समीर गड़पायले, रमेश आकरे, अरविंद भांडेकर यांच्यासह शेकडोो शिवसैनिक उपस्थित होते.