पोरेड्डीवार महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पोलिस बांधवांना बांधल्या राख्या

106

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील चातगाव येथील कै. महेश सावकार पोरेड्डीवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून गुरुवार, 11 ऑगस्ट रोजी चातगाव पोलिस स्टेशनमधील पोलिस अधिकारी व जवानांना राख्या बांधल्या.
देशाच्या व जनतेच्या रक्षणासाठी पोलिस अधिकारी व जवान आपल्या घरापासून व कुटुंबापासून दूर राहून कर्तव्य पार पाडत असतात. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासत पोरेड्डीवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी पोलिसांना राख्या बांधल्या. यावेळी प्रा. वासुदेव तडसे, क्रिष्णा तडसे, पोलिस अधिकारी, कर्मचारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.