भाजपच्या महाजनआक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा : भाजपा आमदार डॉ. देवराव होळी यांचे आवाहन

73

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने महाराष्ट्र राज्यातील भ्रष्टाचारी, घोटाळेबाज, अत्याचारी, महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात दि. 4 एप्रिल 2022 रोजी दुपारी 1 वाजता चंद्रपूर मार्गावरील अभिनव लॉन येथे महा जनआक्रोश मोर्चा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला विशेष मार्गदर्शक म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा ना. देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे माजी वित्त, नियोजन व वनमंत्री तथा आम. मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार, विधान परिषद सदस्य तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस मा. चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, नागरिक, महिला व युवक- युवती, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले आहे.
आज गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी गडचिरोली शहरातील व्यापारी संघटना अध्यक्ष रवीभाऊ चन्नावार, सराफा व्यापारी संघटना पदाधिकारी सुधाकर येंनगंदलवार, गजानन पाटील येनगंदलवार, बी. फॅशन प्लाझा संचालक ,फूटविअर संचालक अनिल करपे एस मार्ट संचालक सारडाजी, होलसेल अनाज विक्रेते काबराजी यांचा प्रतिष्ठान येथे आमदार डॉ. देवराव होळी यांनी स्वतः सदिच्छा भेट दिली. उद्याचे कार्यक्रम निमंत्रण पत्रिका दिले व समस्त व्यापारी संघटना यांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले.