गडचिरोली : खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली मुुलचेरा तालुक्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक आज, १२ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. बैठकीला प्रामुख्याने भाजपचे जिल्हा महामंत्री रविंद्र ओलालवार, आदिवासी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, भाजपचे ज्येष्ठ नेते दिपक हलदर, भाजपा बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, भाजयुमोचे प्रदेश सदस्य स्वप्नील वरघंटे, मुलचेरा तालुका अध्यक्ष प्रकाश दत्ता, तालुका महामंत्री व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत खासदार अशोक नेते यांनी कृषी, सिंचन, विद्युत, पाणी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य व इतर विभागाचा सविस्तर आढावा घेतला व दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून प्रलंबित कामे यथाशिग्र पूर्ण करण्याचे निर्देश दिले.