अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या – जावेद अली

116

गडचिरोली : अहेरी, आलापल्ली व परिसरात आज सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान अवकाळी पावसामुळे कापूस व धान उत्पादक शेतकरी संकटात आले असून उभा पीक तोंडावर आल्यावर अवकाळी पावसाने मोठा शेतकऱ्यांना धक्का दिला व मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत होतांना दिसत आहे. अनेक शेतकरी धान्य पीक घेत असून या धानावर शुद्ध कीड लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक वर्ष कोरोनाचा कहर निर्माण झाला होता तर यावर्षी अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदित झाल्याशिवाय दिसत नाही. महाराष्ट्रात भाजीपाला, किराणा व प्रत्येक वस्तू आकाशाला गवसणी घालत आहे. अशात जर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना शेतीपासून काहीच कमविता आले नाही तर शेतकऱ्यांनी काय करावे अशी चिंता व्यक्त केली जात आहे. करिता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी जावेद अली यांनी केली आहे.