= आरमोरी मतदारसंघातून गजबे यांना तिसऱ्यांदा संधी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आरमोरी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार कृष्णाजी गजबे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ते सोमवार, 28 ऑक्टोबर रोजी नामांकन अर्ज दाखल करणार आहेत.
मागील 10 वर्षांपासून गजबे आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत असून पक्षाने त्यांना तिसऱ्यांदा या मतदारसंघात संधी दिली आहे. या अनुषंगाने आपल्या सर्वांच्या साथीने उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल करणार आहेत.
महायुतीचे अधिकृत उमेदवार कृष्णाजी गजबे सोमवारी सकाळी 10:30 वाजता आदर्श महाविद्यालय मैदान देसाईगंज (वडसा) येथून महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत रॅली काढून आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत.







