खासदार अशोक नेते यांच्या हस्ते गडचिरोलीतील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन

105

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन गडचिरोली द्वारा संचालित कृषी औद्योगिक खरेदी विक्री तथा प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित कुरखेडाच्या सहकार्याने गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन आज १२ नोव्हेंबर रोजी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक खेमनाथजी डोंगरवार, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष व्यंकटी नागीलवार, मुख्य प्रशासक प्रभाकरराव वासेकर, संघाचे उपाध्यक्ष तथा भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, उद्धवजी गहाणे, जीवन मेश्राम, आनंदराव जांभुळकर, व्यवस्थापक सुधाकर वैरागडे, लाकडे व अन्य संस्थेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी सर्वप्रथम खासदार अशोक नेते यांच्या हस्ते विधिवत पूजनाने फित कापून धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.