– ३ जवान जखमी, उपचारासाठी नागपूरला रवाना
– नक्षल चळवळीला मोठा हादरा
गडचिरोली : छत्तीसगड सीमेलगत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्ती – कोटगुल जंगल परिसरात आज सकाळी झालेल्या पोलीस- नक्षल चकमकीत २६ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलिसांना मोठे यश आले आहे. या चकमकीत ३ जवान जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता नागपूर येथे हलविण्यात आले आहे. या कारवाईमुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली पोलीस दलाचे सी-60 जवान ग्यारापत्ती – कोटगुल जंगल परिसरात आज सकाळी नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षल्यांसोबत चकमक उडाली. या चकमकीदरम्यान २६ नक्षल्यांचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. यात ३ पोलीस जवान जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर नक्षलविरोधी अभिमान अधिक तीव्र करण्यात आले आहे.