जनजागरण अभियानांतर्गत ‘बाईक रॅली’ चे आयोजन – डॉ. प्रमोद साळवे यांची माहिती

152
– महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस डॉक्टर सेलचा उपक्रम
गडचिरोली : सध्या संपूर्ण देशात महागाईने थैमान घातले आहे. याला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार अपयशी ठरत आहे. पेट्रोल, डिझेल, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंचे भाव आकाशाला भिडले आहे. यामुळे सामान्य माणसांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. महागाई कमी करण्याच्या मागणीला घेऊन काँग्रेस कमिटीच्या वतीने जनजागरण अभियान राबविण्यात येत अहे. या अभियानांतर्गत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस डॉक्टर सेलतर्फे प्रदेश काँग्रेसच्या सुचनेनूसार आज, 14 नोव्हेंबर रोजी ‘बाईक रॅली’ चे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस डॉक्टर सेलेचे सरचिटणीस डॉ. प्रमोद साळवे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. महागाईमुळे सर्वसामान्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. कोरोनामुळे दोन वर्षे शिक्षण, उद्योग बंद असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या जनता बर्बाद झाली आहे. नवनवीन आजाराच्या भितीने मोठमोठ्या रुग्णालयांनी आरोग्य सेवेचे, यंत्रणेचे रुपांतर बाजार व्यवस्था व्यवसायाशी केल्याने सामान्य माणूस कोलमडलेला आहे. मात्र, याची कोणालाही चिंता नाही. केंद्र शासन यावर कुठलीही उपाययोजना करीत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस व महराष्ट्र प्रदेश काँग्रेस या महागाई, इंधन दरवाढ व इतर अपप्रवृत्तीच्या विररोधात 14 ते 29 नोव्हेंबरपर्यंत जनजागरण अभियान राबविणार आहे. रविवार, 14 नोव्हेंबर रोजी चातगाव ते खुर्सा, गिलगाव, मुरमाडी, रानखेडा, बेलगााव, रांगी, मोहली, सोडे, धानोरा, गोडलवाही, कोंदावाही, पुस्टोला, कारवाफा, साखेरा व जांभळी या मार्गाने परत जांभळी, कटेझरी, चातगाव येथे बॉईक रॅलीची सांगता करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस डॉक्टर सेलचे सरचिटणीस डॉ. प्रमोद साळवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकतून दिली आहे.