Home गडचिरोली भारतीय जनता पार्टी गडचिरोलीच्या जिल्हा प्रशिक्षण वर्गाचा समारोप

भारतीय जनता पार्टी गडचिरोलीच्या जिल्हा प्रशिक्षण वर्गाचा समारोप

150

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे गोंडवाना सैनिकी विद्यालय चामोर्शी रोड (वाकडी) गडचिरोली येथे १२, १३ व १४ नोव्हेंबर असे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण वर्ग पार पडले. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप भाजपचे पूर्व विदर्भ संघटन मंत्री उपेंद्रजी कोठेकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. याप्रसंगी गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, आमदार डॉ. देवरावजी होळी, आमदार कृष्णाजी गजबे, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा ओबीसी मोर्चाचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख बाबुरावजी कोहळे, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री रविंद्रजी ओल्लारवार, प्रशांतजी वाघरे, गोविंदजी सारडा, प्रमोदजी पिपरे, नगराध्यक्षा योगिताताई पिपरे , किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, जि. प. चे कृषी सभापती रमेशजी बारसागडे, समाज कल्याण सभापती रंजिताताई कोडापे, जि. प. सदस्य लताताई पुंघाटे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, गडचिरोली तालुका अध्यक्ष रामरतन गोहणे, चामोर्शी तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख उपस्थित होते. या प्रशिक्षण वर्गात विविध मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रशिक्षण प्रमुख अनिल पोहनकर यांनी केले. या प्रशिक्षण वर्गात 200 च्या वर पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रशिक्षणाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

error: Content is protected !!