पूर्व विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर यांच्या हस्ते खा. अशोक नेते यांच्या ‘सेवा ही समर्पण’ पुस्तकाचे विमोचन

188

गडचिरोली : भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार अशोकजी नेते यांनी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री झाल्यानंतर 8 राज्यांची जबाबदारी स्वीकारुन त्या-त्या राज्यांमध्ये निरंतर प्रवास करून ‘सेवा ही समर्पण’ उपक्रमाअंतर्गत विविध कार्य केले. विविध उपक्रम राबवून नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून दिला तसेच कोविड-19 च्या काळात गरजू व गरीब नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. तसेच कोरोनाबाबत जनजागृती करून नागरिकांना लसीकरणाबाबत प्रवृत्त करून लसीकरणाचे महत्व जनतेला पटवून दिले. त्यांचे विविध राज्यात केलेले कार्य, राबविलेले उपक्रम पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यात आले. आज, 14 नोव्हेंबर रोजी गोंडवाना सैनिकी विद्यालय, वाकडी ( गडचिरोली) येथे आयोजित भाजपच्या जिल्हा प्रशिक्षण वर्गाच्या समारोपीय कार्यक्रमात भाजपचे पूर्व विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर यांच्या हस्ते खासदार अशोक नेते यांच्या ‘सेवा ही समर्पण’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.
यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, आमदार डॉ. देवरावजी होळी, आमदार कृष्णाजी गजबे, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा ओबीसी मोर्चाचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख बाबुरावजी कोहळे, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री रविंद्रजी ओल्लारवार, प्रशांतजी वाघरे, गोविंदजी सारडा, प्रमोदजी पिपरे, नगराध्यक्षा योगिताताई पिपरे, किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, जि. प. चे कृषी सभापती रमेशजी बारसागडे, ज्येष्ठ नेते दामोधरजी अरगेला, जिल्हा सचिव विनोद आकनपल्लीवार, समाज कल्याण सभापती रंजिताताई कोडापे, जि. प. सदस्य लताताई पुंघाटे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजयुमोचे प्रदेश सदस्य स्वप्नील वरघंटे, जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, गडचिरोली तालुका अध्यक्ष रामरतन गोहणे, चामोर्शी तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, भाजयुमोचे शहर अध्यक्ष सागर कुमरे उपस्थित होते.