अहेरी उपविभागातील काही गावांना बसले भूकंपाचे सौम्य धक्के

130

गडचिराेली : जिल्हयातील अहेरी उपविभागातील काही गावपरिसरात भूकंपाचे सौम्य धक्के आज, ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.४८ वाजताच्या सुमारास जाणविल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. या भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केलवर नोंद झाली आहे. अहेरी उपविभागातील अहेरी, आलापल्ली, रेपनपल्ली, कमलापूर, जिमलगट्टा, गोविंदगाव, आष्टी, बोरी, राजाराम आदी गावांमध्ये आज ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याचे जाणवले आहेत. यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे.