गडचिरोली शहराच्या महत्त्वपूर्ण विकासकामांना काही नगरसेवकांचा विरोध, कोरमअभावी सभा तहकूब

122

– नगराध्यक्ष योगिता पिपरे यांची पत्रपरिषदेत माहिती

गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेची विशेष सभा आज, 1 नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. परंतु विकास विरोधी काही नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे कोरमअभावी शहराच्या विकासकामांच्या महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे ही सभा तहकूब करण्यात आली असून येत्या तीन दिवसात विशेष सभा घेण्यात येणार आहे, अशी माहिती गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगिताताई प्रमोद पिपरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गडचिरोली नगर परिषदेची विशेष सभा 1 नाेंव्हेबरला दुपारी 12.30 वाजता गडचिरोली नगर परिषदेच्या सभागृहात शहरातील विविध विकासात्मक कामांबाबत विशेष सभा बाेलाविण्यात आली हाेती. माञ काही नगरसेवक सभेला अनुपस्थित राहिल्याने काेरमअभावी सभा हाेऊ शकली नाही. महत्वपूर्ण विषयावर चर्चा होऊन ठराव पारित झाले असते तर भविष्यात नगर परिषदची आर्थिक परिस्थितीवर पकड ठेवता आली असती. कोविड-19 च्या महारोगामुळे आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ कमी झाल्याचे याेगिताताई पिपरे म्हणाल्या. या सभेत नगराध्यक्षा योगिता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक वैष्णवी नैताम, केशव निंबाेड, नितीन उंदिरवाडे, गुलाब मडावी, अल्का पोहनकर, वर्षा नैताम, नीता उंदिरवाडे, लता लाटकर, स्वीकृत सदस्य प्रमोद पिपरे, रमेश भुरसे उपस्थित असल्याचे याेगिताताई पिपरे यांनी सांगितले. या पञपरिषदेला न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक केशव निंबोड, नितीन उंदीरवाडे, नगरसेविका वर्षा नैताम, वैष्णवी नैताम, लता लाटकर, अल्का पोहनकर, निता उंदीरवाडे, स्वीकृत सदस्य प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, भाजपा नेत्या प्रतिभाताई चौधरी, देवाजी लाटकर, विलास नैताम, विनोद देवोजवार, श्याम वाढई यांची उपस्थिती होती.