विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, २० डिसेंबर २०२२ : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा गडचिरोली जिल्ह्याची महत्त्वाची बैठक आज, 20 डिसेंबर 2022. रोजी सर्किट हाँऊस काँम्पलेक्स गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस सुरेखाताई लुंगारे, महिला मोर्चाच्या प्रदेश सदस्य आसावरी देशमुख, महिला मोर्चाच्या प्रदेश सदस्य रेखाताई डोळस, भाजपा जिल्हाध्यक्ष किसनजी नागदिवे, भाजपा जिल्हा महामंत्री रवीभाऊ ओल्लालवार, प्रमोद पिपरे, प्रशांत वाघरे, गोविंद सारडा, प्रदेश सदस्य बाबुराव कोहडे, भाजपा एसटी मोर्चाचे प्रदेश संघटन सरचिटणीस प्रकाश गेडाम, प्रदेश सदस्य रमेश भुरसे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगिताताई भांडेकर, माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व महिला मोर्चाचे जिल्हा पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद,अध्यक्ष, सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपंचायत सदस्य, नगर परिषद सदस्य, प्रदेश कार्यकारणी पदाधिकारी यांनी प्रामुख्याने उपस्थित राहावे, असे आव्हान महिला आघाडीच्या प्रदेश सदस्य तथा प्रदेश अध्यक्ष, अटल अर्थसाहय, महाराष्ट्र, रेखाताई डोळस यांनी केले आहे.