कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी प्रतिभाताईंचा आदर्श घ्यावा : आमदार डॉ. देवरावजी होळी

132

– जिजामाता कृषिभूषण पुरस्कारप्राप्त प्रतिभाताई चौधरी यांचा आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केला सत्कार

– २ मे २०२२ रोजी नाशिक येथे राज्यपाल, उपमुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन करण्यात आला गौरव

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील नवेगाव येथील प्रगतशील महिला शेतकरी तथा भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी यांना जिजामाता कृषीभूषण पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनाकडून गौरवण्यात आले. कृृषी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी प्रतिभाताईंचा खरोखर आदर्श घेतला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केले असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती विलासजी दशमुखे, नवेगावचे उपसरपंच राजूभाऊ खंगार, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, भाजपा कार्यकर्ते किर्ती मासुरकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिभाताई चौधरी यांनी आपल्या शेतीला प्रगतशील केले असून जिल्ह्यातील ईतर महिलांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे त्यांचे काम आहे. कृषी क्षेत्रामध्ये आता महिला मागे नाहीत हेही त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने दाखवून दिले आहे. मुंबई येथे प्रवासात असल्याने त्यांचा नियोजित वेळी सत्कार करता आला नाही त्याची खंत आहे. परंतु त्यांचे अभिनंदन आपण यापूर्वी केलेले आहे. आज त्यांचा सत्कार करताना आम्हालाही अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी त्यांच्या सत्कारप्रसंगी केले.