ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचितांच्या ६८ कार्यकर्त्यांनी रक्तदान करून स्वाभिमान दिवस केला साजरा

148

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : वंचित बहुजन आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस स्वाभिमान दिवस म्हणून ६८ कार्यकर्त्यांनी रक्तदान करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष दुर्योधन तरारे, जेष्ठ नेते बाळू टेंभुर्णे, कोषाध्यक्ष जि. के. बारसिंगे, महिला नेत्या मालाताई भजगवली, युवक आघाडीचे संदिप सहारे, रोहित टेंभुर्णे, संदिप गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे मोठ्या उत्साहाने रक्तदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सकाळी ११ वाजतापासूनच रक्तदान करण्यासाठी गर्दी केली होती. सदर रक्तदान शिबिर संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू होते.

ऍड. बाळासाहेब आंंबेडकर हे तमाम शोषित पीडितांची व सामाजिक आर्थिक, राजकिय वंचित असलेल्यांच्या न्याय व अधिकाराची लढाई स्वाभिमानाने लढत असल्याने संपूर्ण महाराष्ट्राभर त्यांचा जन्मदिवस हा स्वाभिमान दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केल्या जाते.
यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. अंजली साखरे रक्त संक्रमण अधिकारी, स्वप्निल चापले प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विजया मांदाळे, प्रणय मलोडे, बंडूभाऊ कुंभारे, वसंत नान्हे यांनी शिबिराची सर्व व्यवस्था सांभाळली.
यावेळी बाळू टेंभुर्णे, दुर्योधन तरारे, जि. के. बारसिंगे, मालाताई भजगवली, मनोज टेंभुर्णे, संदिप सहारे, रोहित टेंभुर्णे, अशपक सय्यद, स्वप्नील चोधरी, संदिप गेडाम, सतिश भानारकर, जितेंद्र डोंगरे, सुदर्शन भोयर, संदेश जिड्डेवार, राकेश कातकर, तेजस वाकडे, विकास दुर्गे, यशवंत सुर्यवंशी, अाकाश पंगाटी, अरविंद कोहपरे, अक्षय चौधरी, अनिल आदे, अमिर शेख आदी कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.