ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी सर्व पक्षियांनी पाठविल्या सूचना व शिफारशी

514

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण धोक्यात आले हे आरक्षण टिकवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरूपाची व परिणामाची समकालीन अनुभव धिस्टित सखोल चौकशी करण्यासाठी समर्पित आयोग गठित केलेला आहे. या अनुषंगाने आयोगाने राज्यातील नागरिकांकडून संस्थाकडून संघटनांकडून व नोंदणीकृत राजकीय पक्षाकडून 10 मे 2022 पर्यंत अभिवेदन व सूचना पाठवण्याचे आवाहन केले होते. या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व सामाजिक संघटनांकडून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी गडचिरोली मार्फत सूचना व शिफारशी आयोगाला पाठविल्या आहेत.
राज्य शासनाने इम्पिरिकल डाटा वेळेत सादर न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द बादल ठरविले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षण टिकावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरूपाची व परिणामाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने ओबीसी संघटना व नोंदणीकृत राजकीय पक्षाकडून सूचना व शिफारशी मागितल्या होत्या या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष ओबीसी संघटना व सामाजिक संघटनांच्या वतीने सूचना व शिफारशी निश्चित करून 10 मे रोजी जिल्हाधिकारी गडचिरोलीमार्फत आयोगाला पाठवण्यात आल्या आहेत.
यावेळी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ ओबीसी नेते अनिल पाटील म्हशाखेत्री, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, जिल्हाध्यक्ष दादाजी चुुधरी, कोषाध्यक्ष चंद्रकांत शिवणकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, काँँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, वसंत राऊत, विनीत पोरेड्डीवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राकाँँ पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष विनायक झरकर, कपिल बागडे, शिवसेनेच्या वतीने जिल्हा सहसंपर्कप्रमुख अरविंद कात्रटवार, विलास कोडापे, जय विदर्भ पार्टीचे जिल्हाध्यक्ष तसेच ओबीसी नेते अरुण पाटील मुनघाटे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सचिव हंसराज उंदीरवाडे, कृष्णा चौधरी, अशोक खोब्रागडे, राजन बोरकर, वंचित बहुजन आघाडीचे बाळू टेंभुर्ण, शेकापचे जिल्हाध्यक्ष रामदास जराते, सामाजिक कार्यकर्ते विलास निंबोरकर आदी उपस्थित होते.