संकटात सापडलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यास शिवसेनेचा आधार…!

85

– शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांचा पुढाकार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील टेंभा येथील अल्पभूूधारक शेतकरी मोतीराम चनेकार यांच्या एका बैलाचा विद्युत शॉक लागू मृत्यू झाला. त्यामुळे चनेकार यांच्यावर मोठे संकट कोसळले. बैल दगावल्याने शेती कशी करावे, अशा चिंतेत ते सापडले होते. चिंंतेत सापडलेल्या शेतकऱ्याच्या मदतीला शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे अरविंदभाऊ कात्रटवार धावून गेले आणि शेतकरी मोतीराम चनेकार यांना नवीन बैल घेण्यासाठी आर्थिक मदत दिली.
सध्या उन्हाळयाचे दिवस असल्याने सर्वच शेतकरी आपली जनावरे चराई मोकळे सोडतात. टेंभा येथील शेतकरी मोतीराम चनेकार यांनी सुध्दा आपले बैल चराईसाठी सोडले होते. त्यांचा एक बैल गावातील शेतकरी नरेंद्र ठाकरे यांच्या शेतशिवारात चरण्यासाठी गेला. ठाकरे यांनी आपल्या शेतात काटेरी तारेचे कुंपण केले आहे. काटेरी तारामधून विद्युत प्रवाह सुरू होता. या तारांना शेतात चरण्यासाठी गेलेल्या मोतीराम चनेकार यांच्या बैलाचा स्पर्श होऊन विद्युत शॉक लागून बैलाचा जागीच मृत्यू झाला. विद्युत शॉक लागून बैलाचा मृत्यू झाल्याने टेंभा येथील शेतकरी चनेकार यांच्या समोर मोठे संकट उभे ठाकले होते. एका बैलाच्या भरोशावर शेती कशी करावी, नवीन बैल घेण्यासाठी पैसे कुठे आणावे याची चिंता चनेकार यांना सतावत होती. टेंभा येथील शिवसैनिकांनी घटनेची माहिती शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांना दिली. त्यांनी टेंभा गावात जाऊन संकटात सापडलेले शेतकरी मोतीराम चनेकार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. चनेकार यांनी अरविंदभाऊ कात्रटवार यांना आपली आपबीती सांगितली. चनेकार यांच्यावर ओढवलेले संकट पाहून शिवसेना सहसंपर्क अरविंदभाऊ कात्रटवार यांनी चनेकार यांना नवीन बैल घेण्यासाठी आर्थिक मदत दिली. तसेच शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही दिली. शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी आर्थिक मदतीचा हात दिल्याने शेतकरी मोतीराम चनेकार व त्यांचे कुटुंब भारावून गेले. टेंभा येथील नागरिकांनी सुध्दा शिवसेनेच्या सेवाभावी कार्याप्रती कृतघ्नता व्यक्त करीत गोरगरीबांच्या मदतीसाठी धावून जाणारा अरविंदभाऊ कात्रटवार सच्चा शिवसैनिक असल्याचे गौरोद्गार काढले. याप्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांच्यासह, यादव लोहंबरे उपतालुका प्रमुख शिवसेना गडचिरोली, स्वप्निल खांडरे, राहुल सोरते, संजय शेंडे, निकेश लोहंबरे, मोतीराम भुरसे, निरंजन लोहंबरे, नेपाल लोहंबरे, जगन चापडे, प्रविण मिसार, विनोद मडावी, सुमीत सोनटक्के, सुरेश मडावी, गोपाल मॉगरकार, किशोर देशमुख, अरुण चिचोलकार, चरण देशमुख, मोहन कुलमेथे, धनजी राऊत, माणिक नंनवारे, देवीदास हतबले, मोहन कालमेगे, जीवन नैताम, सुकदेव मासके, रूपेश चनेकर, खुशल काकड़े, राकेश मसके, रविंद्र संदोकार, तुलसीदास आसबले, संदीप भुरसे, संजय चांग, अविनाश झोडे, प्रशांत ठाकुर, राकेश गोड़सेलवार, राहुल पसंदे, कार्तिक पतार, घनश्याम आवारी, प्रल्हाद आवारी, निकेश गिरोले, रोहित कुसनकी, गौरव हर्षे, संतोष कृष्णके, संदीप पसांडे, कुमदेव आवारी, गणेश भोयर, तुमदेव चवरदाने यांच्यासह या भागातील शिवसैनिक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.