– खासदार अशोक नेते व आमदार रामदास आंबटकर यांची उपस्थिती
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा जवळील प्राणहिता नदी घाटावर सुुरू असलेल्या पुष्कर मेळास्थळी आज 11 व्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेेेट दिली. यावेळी विधीवत पूजा केली. त्यानंतर पुष्कर मेळास्थळी आयोजित आरोग्य महाशिबिराचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी त्यांच्यासोबत गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे खासदार अशोक नेते, विधान परिषद सदस्य रामदासजी आंबटकर, भाजपा जिल्हा महामंत्री रविंद्र ओल्लालवार, प्रदेश सदस्या रेखाताई डोळस, सत्यनारायण मंचालवार, दामोदर अरिगेला, जिल्हा सचिव संदीप राचर्लावार, संदीप कोरेत आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते. यावेळी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त करण्यात आला. आज अकराव्या दिवशी पुष्कर घाट येथे भाविकांची मोठी गर्दी होती.