राष्ट्राच्या उन्नतीकरिता युवकांनी संघटित होऊन कार्य करणे काळाची गरज : अनुप कोहळे

53

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : निसर्गाने मानव जातीला जन्मापासून मृत्यूपर्यंत भरभरून दिले असून, त्याचे ऋण फेडणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे, त्याकरिता युवकांनी आप आपसांतील जातीभेद व मतभेद विसरत संघटित होऊन सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याकरिता पुढे यावे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा युवा पुरस्कारप्राप्त तथा युवा सामाजिक कार्यकर्ते अनुप कोहळे यांनी केले. ते कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक संलग्नित, छात्रवीर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महा.मोरवा व “पाहणारे डोळे मदतीचे हात”  या संस्थेच्या वतीने उमरी पोतदार ता.पोंभुर्णा येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या शिबिरात “सामाजिक उत्तरदायित्व आणि युवकांची भूमिका” या विषयावर बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, भारत युवकांचा देश असून हीच युवा शक्ती देशाची खरी ताकत आहे आणि ह्याच माध्यमातून राष्ट्राची उन्नती व स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास देखील होऊ शकतो. यावेळी मुख्य अतिथी म्हणून सरपंच ठामेश्वरी लेनगुरे, उपसरपंच मंगेश उपरे, Nss कार्यक्रम अधिकारी प्रा. रमेश बोंडे, प्रा. शशांक पवार, पाहणारे डोळे मदतीचे हात संस्थेचे अध्यक्ष अंकुश उराडे, युवा सामाजिक कार्यकर्ते प्रेम जरपोतवार सह मोठ्या संख्येने शिबिरार्थी, गावातील युवक युवती व संस्थेचे पदादाधिकारी उपस्थित होते.