केन्द्रिय मंत्री ना. पुरूषोत्तमजी रूपाला यांचे गडचिरोली भाजपातर्फे स्वागत

121

– गडचिरोली येथील फक्शन हाॅलमध्ये शेतकरी मेळावा संपन्न

– भाजपात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे ना. रूपाला यांच्या हस्ते स्वागत

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली या आकांक्षित जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले भारत सरकारचे केन्द्रिय मंत्री ना. पुरूषोत्तमजी रूपाला यांचे गडचिरोली येथील फक्शन हाॅलमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात गडचिरोली भाजपातर्फे जंगी स्वागत करण्यात आले. शेतकरी मेळाव्यादरम्यान शिवसेनेतून भाजपात प्रवेश करणाऱ्या युवकांचे ना. पुरूषोत्तमजी रूपाला यांच्या हस्ते स्वागत करून भाजपात प्रवेश देण्यात आले.
यावेळी मंचावर खासदार अशोकजी नेते राष्ट्रीय महामंत्री भाजपा जनजाती मोर्चा, किसनजी नागदेवे भाजपा जिल्हा अध्यक्ष गडचिरोली, आमदार डाॅ. देवरावजी होळी, आमदार कृष्णाजी गजबे, बाबुरावजी कोहळे प्रदेश सदस्य भाजपा, प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस भाजपा एस. टि. मोर्चा महाराष्ट्र प्रदेश, गोविंदजी सारडा जिल्हा महामंत्री, प्रमोदजी पिपरे भाजपा जिल्हा महामंत्री, रमेशजी भुरसे प्रदेश सदस्य किसान मोर्चा महाराष्ट्र, रेखाताई डोळस, प्रदेश सदस्य भाजपा महिला आघाडी महाराष्ट्र, अनिलजी पोहनकर जिल्हा उपााध्यक्ष भाजपा, सदानंदजी कुथे जिल्हा संपर्क प्रमुख, योगीताताई भांडेकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष भाजपा महिला आघाडी, योगीताताई पिपरे, माजी नगराध्यक्ष न. प. गडचिरोली, चागंदेवजी फाये जिल्हा अध्यक्ष भाजयुमो गडचिरोली, मुक्तेश्वरजी काटवे भाजपा शहर अध्यक्ष यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.