पालकमंत्री ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत मालडोंगरी येथील सरपंच, उपसरपंच यांच्यासह सदस्यांचा राष्ट्रवादी, भाजपामधून काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

188

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि पालकमंत्री ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या कार्याने प्रेरित होऊन राष्ट्रवादी, भाजपा पक्षातून काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, भविष्यातही हा ओघ असाच राहील.

पालकमंत्री ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी पालकमंत्री ना. विजयभाऊ वडेट्टीवार व माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ब्रम्हपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथील सरपंच मंजुषा ठाकरे, उपसरपंच नितीन घोरमोडे, नितीन चौधरी, गणेश पंढरी घोरमोडे, भास्कर शंकर धोंगडे, रवी ठाकरे, प्रफुल बनकर, राजेश्वर पिलारे, माया धोंगडे, उर्मिला पारधी, भावना गायकवाड, संतोष पिलारे, उत्तम ठाकरे, अरुण दिघोरे, रवींद्र गायकवाड यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी प्रभाकरजी शेलोकर मुख्य प्रशासक बाजार समिती ब्रम्हपुरी, प्रभाकर उर्फ सोनु नाकतोडे सरपंच उदापूर तथा ब्रम्हपुरी तालुका सरपंच संघटना अध्यक्ष, प्रेमानंद मेश्राम सरपंच सोनेगाव आदी उपस्थित होते.