खासदार अशोकजी नेते यांनी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांची घेतली भेट

174

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आज दिनांक 25/4/2022 ला गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री, अनु. जनजाती मोर्चा अशोकजी नेते यांनी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजयजी मीना यांच्याशी गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील बंगाली शेतकरी बांधवांंचे चाळीस वर्षांंपासून अतिक्रमण आहे. त्यांचे जमिनीवर अतिक्रमण यथास्थित ठेवण्याकरिता सूचना दिल्या. 1971 नंतर बंगाली समाज जिल्ह्यात पुनर्वसित करण्यात आले. तेव्हापासूनच वहिवाट सुरू आहे. शासनाचे जमिनीतील 50, 52 वर्ष पूर्ण होत आहे.
सदर 2005 पूर्वीची अतिक्रमण हटविल्यास त्याचे उपासमारीची वेळ येईल. शेतकरी शेतमजूर कुटुंब जगण्याकरिता शेती अबाधित असणे अनिर्वाय आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांना खासदार अशोकजी नेते यांनी केल्या.